ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

वरूड येथील 35 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

120 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील वरुड येथील एका 35 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 21 जुलै 2024 रोज रविवारला दुपारच्या सुमारास घडली.

सतीष अशोक मंदे वय 35 वर्ष रा.वरुड असे विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.सतीश हा काल दि.21 जुलैला शेतात कपाशीवर फवारणी करण्यासाठी घरून दुपारी 1: 30 वाजताच्या सुमारास गेला होता.

सायंकाळचे 5 वाजले पण तो शेतातुन फवारनी करून घरी परत न आल्याने आई मुलाला पाहन्यासाठी शेतात गेली असता सतीष  हा शेतात असलेल्या बोरवेल जवळील आर्थीनचे तारा जवळ पडुन दिसला.तेव्हा आई लगेच त्याला हात लावायला गेली असता त्यांना पण विजेचा धक्का बसून काही अंतर दूर फेकल्या गेले.काही वेळानी त्यांनी स्वतःला सावरून त्यांच्या मुलीला फोन करून घटनेची माहिती दिली.

सदर घटनेची माहिती मुलीला मिळताच तिने गावातील नातेवाईकांना लगेच शेतात पाठविले.नातेवाईक आल्या नंतर नातेवाईकांचे मदतीने आधी त्या परिसरातिल विजेचा पुरवठा बंद करून त्याला व आईला प्रथम उपचारा करिता नातेवाईकांनी लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पण तेथील डॉक्टरांनी सतीषला मृत घोषित केले.सतिश यांचे पश्चात आई,पत्नी,मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनात जमादार अफजल पठाण करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर