ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

म्हैसदोडका येथे श्री तुकडोजी महाराज पुण्यस्मरण व सर्व संत स्मृतीदिन सोहळा संपन्न

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई / मारेगाव

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच सर्व संत स्मृतीदिनानिमित्त दोन दिवसीय धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हा सोहळा शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ व रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी हनुमान देवस्थान, म्हैसदोडका (ता. मारेगाव, जि. यवतमाळ) येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, श्री जगन्नाथ बाबा महिला भजन मंडळ, श्री पदावली भजन मंडळ तसेच समस्त ग्रामवासी म्हैसदोडका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.


शनिवार, दि. १७ जानेवारी रोजी पहाटे ग्रामसफाई, घटस्थापना, सामुदायिक ध्यान व ग्रामगीता वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवसभर विविध भजन मंडळांचे भजन, कीर्तन व सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये परिसरातील तसेच बाहेरील नामवंत भजन मंडळांनी सहभाग घेतला. सायंकाळी कु.भाविका सुखदेव खंडाळकर (नागपूर) यांचे प्रभावी कीर्तन झाले.रविवार, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी सामुदायिक ध्यान व ग्रामगीता वाचनानंतर पालखी सोहळा व दिंडी भजन पार पडले. दुपारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा, तालुका व गुरुकुंज मोजरी येथील मान्यवर प्रचारक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सायंकाळी काला व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.या सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामगीतेतील विचार, सामाजिक एकोपा, श्रमसंस्कार व ग्रामोन्नतीचा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर