ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मार्की येथे कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषद संपन्न

504 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कार्यक्रमास कलावंत प्रबोधनकार पथनाट्यकार,एकल संघटीत कलावंतची हजेरी

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी :- अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती तालूका शाखा झरी जामणी च्या विद्यमाने आणि मार्की येथील गूरूदेव सेवा मंडळाच्या सहभागातून दि.२६ जून रोजी मार्की (बू) येथील गंगा माता मंदिरा च्या सभागृहात कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदेचा सोहळा   संपन्न झाला  .

राष्ट्रसंतांच्या विचारानी व प्रेरणेनी प्रभावीत ३० अतिदूर्गम गावखेड्यातून जमलेल्या ७० भजन गायन मंडळाच्या महीला व पूरूष  कलावंतांनी दमदार भजन गायन सादर केलीत.ह्या प्रसंगी ऊपस्थित भजन गायन मंडळीचा शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमूख मार्गदर्शक समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनी कलावंतांना संबोधीत करतांना अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीचे कार्याची माहीती दिली.तालूकाध्यक्ष हरिश्चंद्रजी बल्की पाटील,तालूका सचीव शंकरराव बावने,मोरेश्वर ऊदकवार    तळागाळातील प्रत्येक कलावंतापर्यत पोहचण्याचे ऊद्दिष्ट्य असुन असल्याने जि.प./पं.स.सर्कल निहाय कलावंत आयोजन करण्यात येणार आहे.

कलावंत संगठन मजबूत करण्याचे कार्य जोमाने सूरू करण्यात येत आहे,कलावंतांचे प्रश्न अधिक ताकदीने सोडविणे प्रलंबीत प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सोमनाथ दादा गायकवाड ह्याचे समर्थ नेतृत्वात  जिल्हाकचेरीवर एक लाख कलावंतांचा आक्रोश मोर्चा लवकरच आयोजीत करणार असल्याचे  सांगण्यात आले.

यावेळी   जिल्हा ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,राळेगाव तालूकाध्यक्ष व गूरूदेव सेवा समिती गूरूकूंज मोझरी चे जिवन प्रचारक गंगाधरजी घोटेकर,वणी तालूकाध्यक्ष चंपतराव पाचभाई,राळेगाव तालूक्याचे प्रभावी सामाजिक कार्यकर्ते व गूरूदेव सेवा मंडळ वडकी चे अध्यक्ष बंडूभाऊ ऊताणे,विठ्ठलरावजी काकडे यांनी  मार्गदर्शन केले  या कार्यक्रमास संरपंच दिवाकर उइके,उपसरपंच गजानन मिलमिले , पो.पा.अनुसया धुर्वे व्यास पिठावर उपस्थित होते .



यशस्वितेसाठी मार्की येथील महीला व पूरूष भजन मंडळाचे कलावंतांनी विशेषतः सूरेशराव बल्की ,आनंदराव हजारी, गजानन पोलचट्टीवार,सूरेश हजारे ,श्रावण बर्लावार,सतीश टोंगे,प्रदीप पिंपळकर,पांडूरंग पोलचेट्टीवार ,भोलानाथ राऊत,गजानन पानगंटीवार  यांनी  परिश्रम घेतले  कलावंत,वारकरी,प्रबोधनकार
,पथनाट्यकार,एकल व संघटीत कलावंत मंडळी कार्यक्रमाला एकवटली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर