ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आसान्या कार्यालयाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

184 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क यवतमाळ

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यानपिढ्या तेवत राहिला आहे.परखड लिखाणातून रंजलेल्या गांजलेल्या टिचलेल्या वंचितांची आर्त हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळावी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त आसान्या कार्यालयाच्या वतीने त्यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर मृणालिनी दहीकर यांनी आपल्या विचारातून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण मानले जाते. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे.

 स्वातंत्र्य, समता, न्याय ,आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारे,बंडखोरी करणारे, धाडसी,करारी शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले. साहित्यातून समाज प्रबोधन आणि त्यातून समाज परिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचे सूत्र होते असे अण्णाभाऊंचे साहित्य क्षेत्रातील योगदान आणि शोषितांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आयुष्य हे अमूल्य आहे असे त्या म्हणाल्या यावेळी खंडारे साहेब, नितेश मेश्राम नितीन पाटील, सिसले, गायकवाड, डोंगरे आणि महिला भगिनी तसेच जयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर