ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

दिग्रस भूमीअभिलेख कार्यालयात लाचप्रकरण

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपअधीक्षक व भूमापक ५ हजारांची लाच घेताना रंगेहात अटकेत

रितेश क्षीरसागर | यवतमाळ

यवतमाळ, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दिग्रस येथील भूमीअभिलेख कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून दोन लोकसेवकांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.

या कारवाईत सखाराम नरसिंग पवार (वय ४९), उपअधीक्षक, भूमीअभिलेख कार्यालय, दिग्रस आणि आशिष काशिनाथ शेलोकर (वय ४७), नझुल परिरक्षण भूमापक, दिग्रस यांना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांच्या मालकीची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्यांच्या पतीच्या नावे केली होती. या मालमत्तेची फेरफार नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे भूमीअभिलेख कार्यालयात सादर करण्यात आली होती. मात्र, संबंधित कामासाठी भूमापक आशिष शेलोकर यांनी उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितल्याचा आरोप आहे.

फेरफार नोंदीसाठी एकूण ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार तक्रारदारांनी ACB कडे दाखल केली. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत शेलोकर यांनी ही रक्कम स्वतःसाठी व उपअधीक्षक पवार यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले.

यानुसार ३ फेब्रुवारी रोजी ACB पथकाने सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदारांकडून शेलोकर यांनी ५ हजार रुपये स्वीकारले. त्यातील २,५०० रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित २,५०० रुपये उपअधीक्षक पवार यांना देताच दोघांनाही उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर,  अप्पर पोलीस अधीक्षक सचींद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन घनवट व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी ACB यवतमाळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ACB प्रशासनाने केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर