ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात आगामी विधानसभेसाठी दोन मतदान केंद्रांची वाढ

243 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नऊ केंद्राचे मतदारांच्या सोयीसाठी विभाजन

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीकोणातून मतदारांच्या सोयीसाठी दोन केंद्रात वाढ करण्यात आहे. तर सहा केंद्रात मागणी नुसार विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना आता मतदान करणे  पूर्वी पेक्षा जवळ सोयीचे होणार आहे.

तालुक्यातील कांही गावातील मतदारांना मतदान केंद्रावर पाच ते सात किमी चे अंतर पार करुण मतदान करायला जावे लागत होते.त्यामुळे मतदान करायला जाणे गैरसोयीचे होत असल्याने याचा परिणाम मतदानावर होत असे.त्यामुळे कमी अंतरावर मतदान केंद्र द्यावे अशी मागणी मतदारांनी केली होती.याबाबत आ.संजीवरेड्डी बोदकुरवार,तालुका कांग्रेस चे अध्यक्ष मारोती गौरकार, शिवसेना (उबाठा गट) जिल्हा संघटक डीमन टोंगे,भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट आदीनी तहसीलदार मारेगांव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघा चे उत्तम निलावाड यांचेकडे मागणी केली होती.

आलेल्या सूचनाचा विचार करुन मा.उपविभागीय अधिकारी वणी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 76 वणी विधानसभा मतदारसंघ यांचे मार्गदर्शनखाली तहसीलदार मारेगांव यांनी खैरगाव बुटी आणि मेंढणी या गावात नवीन मतदान केंद्र निर्माण केले आहे. तर नरसाळा येथील दोन केंद्रा पैकी  घोडदरा येथे एक केंद्र देण्यात आले आहे. मच्छिद्रा येथील दोन केंद्रा पैकी एक ‘डोलडोंगरगाव, गौराळा येथील दोन केंद्रा पैकी एक वरुड, नवरगाव येथील दोन केंद्रा पैकी एक टाकरखेडा, बुरांडा ख येथील दोन केंद्रा पैकी एक हटवांजरी,तर सिंधी (म) येथील दोन केंद्रा पैकी एक केंद्र महागाव येथे स्थलातरीत करण्यात आले आहे.

तर दापोराचे मतदार बोरी बु मोयेथून काढून चिंचमंडळ येथे, खापरीचे मतदार करणवाडी केंद्रातून काढून बुरांडा ख येथे तर आवळगाव येथील मतदार जळका येथून काढून खैरगाव भेदी येथील मतदान केंद्रात जोडण्यात आले आहे.नव्या बदलाची मतदारांनी नोंद घ्यावी असे आव्हान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 76 वणी विधानसभा मतदारसंघ उत्तम निलावाड यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर