ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

मारेगाव ते घोडदरा बससेवेसाठी काँग्रेसकडे मागणी

127 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काँग्रेसच्या शेतकरी न्याययात्रेत केली मागणी

काँग्रेस तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार का?

सुरेश पाचभाई मारेगाव,

बस अभावी होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी पायपीट ही टाळता यावी यासाठी घोडदरा येथील विद्यार्थ्यांनी चक्क काँग्रेस न्याय यात्रेत जाऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले.काँग्रेस तरी या विद्यार्थ्यांना न्याय देईल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी मारेगाव येथे शिक्षणासाठी ये – जा करत असतात. घोडदरा हे गाव मारेगाव पासून अंदाजे सात किमी अंतरावर आहे.येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी शाळेत ये – जा करण्यासाठी वाहन नसल्याने त्यांना सुमारे तीन किमी अंतर खडकी बस थांबा पर्यंत पायदळ यावे लागत आहे.येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत दिनांक 20 जुन 2024 रोजी ठराव घेण्यात आला असून घेण्यात आलेला ठराव क्रमांक 10 नुसार दिनांक 26 जुन 2024 रोजी राज्य परिवहन मंडळ शाखा वणी यांना निवेदन देण्यात आले.

परंतु संबंधित परिवहन विभागाने घोडदरा येथील विद्यार्थ्यांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली.म्हणून दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला दुपारी 3 वाजता काँगेसच्या पदयात्राचे खडकी बस थांबा येथे आगमन होताच गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच महिला व पालक यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसच्या रॅलीचे स्वागत केले.आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवकरात लवकर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.यावेळी काँग्रेसचे पदयात्रेचे आशिष खुलसंगे मारेगाव काँग्रेस तालुका कमिटी अध्यक्ष मारोती गौरकर यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर