ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव बसची दुचाकीला धडक, दुचाकी चालक गंभीर

138 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

करंजी-वणी राज्य महामार्गावरील खडकी टेकडीजवळील घटना

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव येथील आपले काम आटोपून दुचाकीने परत आपल्या गावाकडे येत असताना समोरून येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिली यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.ही घटना आज दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी सोमवारला सायंकाळी ७ वाजताचे दरम्यान घडली.

जिवन वसंतराव आत्राम वय अंदाजे २३ वर्ष रा.सालई पोड, (खंडणी) तालुका मारेगाव असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.सालई पोड येथील जिवन हा मारेगाव येथे दुचाकीचे फायन्स भरण्यासाठी आला होता. तेथील काम आटपून तो आपल्या गावाकडे परत जात असताना खडकी फाट्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या टेकडी जवळ त्याच्या गाडीला समोरून येणाऱ्या बस ने जोरदार धडक दिली.ही बस यवतमाळ वरून वणी चंद्रपूर मार्गे राजुरा येथे जात होती.

या अपघातात जिवन गंभीर जखमी झाला असून त्याचा अपघात घडताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचार साठी यवतमाळ येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.सदर घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर