ग्राम रोजगार सहाय्यकांचा मुंबई येथे मेळावा

सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी येण्याचे केले आवाहन

मारेगाव तालुका प्रतिनिधी:- प्रमोद रा. मेश्राम,

ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यासाठी GR सुधा पारित झाला असून दिनांक 6/10/2024 रोजी ग्राम रोजगार सहायक यांचा महामेळावा मुंबई गोरेगाव येथे आयोजित केला आहे. तेव्हा या महामेळाव्याला सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.

ग्रामरोजगार सहाय्यक यांच्या जीवनातला  खडतर प्रवास संपला आहे. ग्रामरोजगार सहायकांना  न्याय मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  व श्रीकांत शिंदे तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नाने मिळाला आहे. त्यासाठी कुठलाही ग्राम रोजगार सहायक घरी न राहता मुंबईला निघायचे आहे. जाण्या साठी सर्वांची व्यवस्था केलेली आहे.तरी सर्वांनी आवर्जून तयारी करून यायचे आहे. आणि  आपल्या जीवनात सुखद क्षण बघायचा आहे.

कोणीही कारणे न सांगता, सर्व कामे बाजूला सारून  जायचे म्हणजे जायचे आहे. जर आकडा समजला तर गाड्यांची व्यवस्था करायला सोपे जाईल. त्यासाठी सर्वांनी आपले नाव ,ग्राम पं.नाव, मो. नं.टाकायचा आहे. 1 वाजेर्यंत कळवायचे आहे. आपल्या शेजारील बंधुला कळवा. ज्याला ज्याला कळवता येईल त्याला कळवा असे आवाहन कार्याध्यक्ष संदीप भरबडे यांनी केलेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!