ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना पंधरवाडा सुरू

236 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान पंधरवडा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 02 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागरीकांच्या व शेतक-यांच्या जिव्हाळयाची विविध महसुली कामे मोहिम स्वरूपात पार पाडण्यासाठी सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबत निर्देश शासन स्तरावरून प्राप्त झालेले आहेत.

त्यानुसार झरी जामणी तालुक्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पहिला टप्पा पांदण रस्त्याबाबत आज रोजी सुरुवात करण्यात आली.सदरचा अभियान तीन टप्प्यात राबवायचे असुन 17 ते 22 सप्टेंबर या पहील्या टप्प्यात पांदण रस्ते विषयक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये शिव/पांदण/वहीवाटीचे रस्त्यांचे सवेक्षण करणे, ज्या पांदण रस्त्यांची नोंद गाव नकाशात नाही त्याची नोंद घेण्यात येणार आहे.

तसेच शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासित करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन निश्चीत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. 23 ते 27 सप्टेंबर या दुस-या टप्प्यात सर्वांसाठी घरे या विषयाअंतर्गत रहीवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करणे ही कामे हाती घेतले जाणार आहे.

28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या तिस-या टप्प्यात मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली विविध नाविण्यपुर्ण उपक्रम महसुल विभागामार्फत राबविले जाणार आहेत. तेव्हा तालुक्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज अभियान पंधरवड्यामध्ये भाग  घ्यावे असे आवाहन तहसीलदार श्री अक्षय रासने यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर