ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यात ‘महाविस्तार AI’ अ‍ॅपचा जोरदार प्रचार

418 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका कृषी अधिकारी कु. दिपाली खवले यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सुरेश पाचभाई पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘महाविस्तार AI’ मोबाईल अ‍ॅपच्या प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप तात्काळ डाउनलोड करून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कु. दिपाली खवले यांनी केले आहे.

कु. खवले म्हणाल्या, “महाविस्तार AI अ‍ॅपच्या सहाय्याने शेतकऱ्यांना किड-रोग ओळख, हवामान अंदाज, पिकनिहाय शिफारसी, बाजारभाव, शासकीय योजना तसेच तज्ञांचा सल्ला थेट मोबाईलवर मिळणार आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांची निर्णयक्षमता वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे.”

कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी गावागावांत जाऊन अ‍ॅप डाउनलोड प्रक्रिया, त्याचा वापर आणि फायदे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक सत्रे आयोजित करण्यात येत असून शेतकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सध्या तालुक्यात महाविस्तार AI अ‍ॅपचे मोठ्या प्रमाणावर डाउनलोडिंग सुरू असून, शंभर टक्के शेतकरी जोडणीचे लक्ष्य कृषि विभागाने निश्चित केले आहे.

“शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी महाविस्तार AI अ‍ॅप हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे अ‍ॅप डाउनलोड करून तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन कु. दिपाली खवले यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर