ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

संजय देरकर यांच्या प्रचार रॅलीत उसळला अलोट जनसागर

1.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रॅलीत अफाट गर्दीने तोडले सर्व रेकॉर्ड, वणीत घोंघावलं भगवं वादळ

तालुका प्रतिनिधी वणी

वणी:-येथे आज महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचार रॅलीत अलोट जन सैलाब उसळला. हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले. युवावर्गासह महिला पुरुष व जेष्ठ नागरिक सह वृद्धही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत समुदाय उमळला होता.शहरात आज भगवं वादळ उठलं होतं. जिकडे तिकडे भगवे झेंडे लहरत होते.भगव्या टोप्या घालून नागरिक ऐटीत रॅलीत सामील झाले होते. जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने शहर दुमदुमले होते.या भव्य रॅलीने शहरवासीयांबरोबरच राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधले.

रॅलीत महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती. रॅलीतील लोकांच्या गर्दीने शहर गजबजून उठलं होतं. रॅलीत उसळलेला जनसागर हा परिवर्तनाची नांदी असल्याची एकच चर्चा शहरात रंगली होती.शेतकरी,शेतमजूर व सर्वसामान्यांचा आक्रोश या रॅलीतून दिसून आला. रॅलीत उसळलेल्या गर्दीने आज शहरातील रस्तेही अरुंद वाटत होते.जत्रा मैदान व दीपक चौपाटी मार्ग नागरिकांच्या गर्दीने फुलाला होता.जत्रा मैदान येथून रॅलीला सुरवात झाली. वेगवेगळे बॅण्ड पथक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने निघाली. टिळक चौक येथे ही रॅली पोहचल्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. रॅलीत यवतमाळचे खासदार संजय देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित झाले होते.

संजय देरकर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या या रॅलीने गर्दीचे सर्व रेकॉर्ड तोडले.शहरासह खेड्यापाड्यातून नागरिक उलटून आले होते. महाविकास आघाडीनेही रॅली उचलून धरली. काँग्रेसचे सर्वच प्रमुख नेते रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभाग घेतला. शिवसैनिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादी व घटक पक्षांचेही नेते व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार,आशिष खुलसंगे, टिकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, इजहार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीचे विजय नगराळे हे देखील रॅलीत सहभागी झाले होते. तसेच शिवसेनेचे संजय निखाडे, सुनिल कातकडे, दीपक कोकास, युवासेनेचे अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, राजेंद्र ईद्दे, प्रवीण खानझोडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे सर्वच पक्षांच्या महिला पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाल्या होत्या. रॅलीत महिला व मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. संजय देरकर यांनी या प्रचार रॅलीतून जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

टिळक चौकळ येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी खासदार संजय देशमुख यांनी शेतकऱ्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब या सरकार कडून घायचा आहे, अशी गर्जना या रॅलीतून केली. हे शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्ररतून हद्दपार करायचं आहे. त्याकरिता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. महाविकास आघाडीचं सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल.

महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्यात येईल. विमा सुरक्षा कवच २५ लाखांपर्यंत वाढविण्यात येईल. महाराष्ट्रात महिलांना एसटीचा प्रवास मोफत राहील. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात येईल, हा महाविकास आघाडीचा वचननामा आहे, असेही संजय देशमुख जाहीरपणे सांगितले.

यावेळी वामनराव कासावार, आशिष खुलसंगे यांनीही विद्यमान सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. सर्वसामान्यांच्या हक्काचं सरकार हवं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या, अशी साद त्यांनी मतदारांना घातली. संजय देरकर यांनी आपण निवडून आल्यास लोकाभिमुख कार्य करण्यावर भर दिला जाईल असे आश्वासन दिले. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊनच कुठलेही निर्णय घेण्यात येईल.

शेतकरी व सर्वसामान्य जनतेची दुर्गती करणाऱ्या भाजप सरकारला सत्तेबाहेर खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २० तारखेला मतदान करायला जातांना आजचं भयावह चित्र डोळ्यासमोर ठेऊनच मतदान करावं आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून परिवर्तनाच्या या लढ्यात सहभागी व्हावं, अशी आर्त हाक त्यांनी मतदारांना दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर