ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जय सहकार पॅनल चा सर्वत्र ” जय जयकार “

63 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी परिसरात व ग्रामीण भागात ” जय सहकार ” वरचड,,

तालुका प्रतिनीधी:- वणी

वणी परिसरातील सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी येत्या 6 नोव्हेंबर 2022 रोजी निवडणूक होणार आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. देविदास काळे यांनी वसंत जिनिंग निवडणुकीत जय सहकार पॅनलचा एकतर्फी विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला.त्याचे कारण असे आहे.

की वणी परिसरात व ग्रामीण भागात ” जय सहकार ” वरचड होताना दिसते आहे.

दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या वणी, शिंदोला, मार्डी, मारेगाव व मुकुटबन येथे जिनिंग प्रेसिंग युनिट आहे. मागील 10 वर्षांपासून ऍड. देविदास काळे वसंत जिनिंग संस्थेच्या अध्यक्ष पदी आहे. वणी, मारेगाव आणि झरीजामनी तालुक्यातील 10 हजार 934 शेतकरी वसंत जिनिंग संस्थेचे सभासद आहे. यात 7 हजार पेक्षा जास्त सभासद ऍड. काळे यांचे कार्यकाळात जुळले आहे.

सहकार पॅनलकडून वर्तमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे, विजयभाऊ चोरडिया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई व नामदेव सुरपाम संचालक पदासाठी निवडणूक लढत आहे.

या निवडणुकीत 17 जागांसाठी 63 उमेदवार रिंगणात उतरले आहे. ऍड देविदास काळे यांच्या जय सहकार पॅनल सह माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात परिवर्तन पॅनल, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात शेतकरी एकता परिवर्तन पॅनल व शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, भाकप यांनी एकत्र येत वसंत जिनिंग पॅनल या नावाने पॅनल उतरवले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर