ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव येथे नशामुक्त पहाट कार्यक्रम संपन्न

137 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालय येथे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित व्यसनमुक्ती व जनजागृती कार्यक्रम आज दिनांक 17 ऑक्टोंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 2:15 वाजताच्या सुमारास करण्यात आला.

डॉ.पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची संकल्पना व मार्गदर्शनात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित व्यसनमुक्ती जनजागृती अभियान अंतर्गत नशा मुक्त पहाट सशक्त यवतमाळ नारा व्यसनाला देऊ नका थारा या ब्रीद वाक्याने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथे अभीर देसाई मुक्तांगण येथील समूपदेशक व ठाणेदार जनार्धन खंडेराव यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

अबीर देसाई यांनी मुक्तांगण स्थापनेबाबतीत पार्श्वभूमी विषय सांगितले तसेच अल्कोहोल,तंबाखू ,ड्रग्स,इंटरनेट अती वापराचे वेसन या व इतर व्यसणावर उपचार तसेच साध्या सोप्या पद्धतीने करावयाच्या उपचार पद्धती यावर मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना अबीर देसाई यांनी मुक्तांगण पार्श्वभूमीवर सांगताना डॉक्टर पुलदेशपांडे यांच्या प्रेरणेने डॉक्टर अनिल अवचट व डॉ सुनंदा अवचट यांनी मुक्तांगण स्थापन केले.हा कार्यक्रम पोलीस स्टेशन मारेगाव यांचे वतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक गणमान्य व्यक्ती हजर होते.मार्डी चौक येथे सादर केले पथनाट्य कलावाणिज्य महाविद्यालय येथे कार्यक्रम सादर केल्यानंतर महात्मा फुले सामाजिक कार्य विभाग यवतमाळ येथील विद्यार्थ्यांनी मारेगाव येथील मार्डी चौक येथे व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केले.दारू तसेच इतर व्यसनाचे काय दुष्परिणाम समाजावर तसेच कुटुंबियांवर होतात याचे प्रत्यक्ष पथनाट्याद्वारे प्रत्यक्ष सादरीकरण केले.यावेळी बाजारासाठी आलेल्या अनेक महिला पुरुषांनी या पथनाट्याचा आस्वाद घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर