ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मारेगाव पंचायत समितीच्या समोरील झाळावर कोसळली वीज.

85 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुट्टी असल्याने जीवितहानी टळली.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस कोसळत आहे. त्यातच आज दिनांक 9 जुलै 2022 रोज शनिवारला दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसा सोबतच विजेच्या कडकडाटालाही सुरुवात होऊन मारेगाव येथील पंचायत समितीच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर वीज कोसळली. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने जोरदार एंट्री केली आहेत. आणि पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वीज कोसळणे हे आता नित्याचेच झालेले आहेत. मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. आज दुपारी मारेगाव शहरात जोरदार मुसळधार पाऊस सुरु असतांना विजेचा जोरदार कडकडाट सुरू झाला. आणि पंचायत समितीच्या आवारात असलेल्या निंबाच्या झाडावर विज कोसळली.

त्यामुळे निंबाचा झाळाचा काही भाग जळालेला आहे.पंचायत समिती मध्ये नेहमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आणि विसावा म्हणून ते याच वृक्षाखाली बसतात. परंतु सुदैवाने आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कार्यालयाला सुट्टी होती. त्या मुळे आज त्या ठिकाणी कोणीही नव्हते..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर