ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

रामेश्वर येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यातील रामेश्वर येथील एका 44 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल रात्री 7:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

साविस्तर वृत्त असे की..
प्रमोद व्यंकटेश एकरे वय सुमारे 44 वर्ष रा.रामेश्वर असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून प्रमोद हा काल दिनांक 5 जानेवारी 2022 रोज गुरुवरला सकाळी 10 वाजताच्या सुमारास नेहमी प्रमाणे शेतातील तुरी मोडण्यासाठी गेला होता.

तो सायंकाळ झाली तरी घरी नपरतल्या मुळे कुटुंबातील काही व्यक्तीनी गावात त्याचा शोधा-शोध घेतला पण तो आढळून आला नाही.नंतर त्यांनी शेतात शोध घेतला असता शेतातील गोठ्यात प्रमोद हा विषारी कीटकनाशक प्राशन करून पडलेल्या अवस्थेत आढळला त्यांनी लगेच त्याला मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याचे नावाने येथे 2 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा या वर्षीचा अतिवृष्टी मुळे झाल्येल्या नुकसानी मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

मृतक शेतकरी प्रमोद याच्या पश्चात आई,वडील,पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.या घटनेने रामेश्वर गावात शोकाकुळ पसरली आहे.या घटनेच्या पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर