ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोनयुवक गंभीर जखमी

2.9k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अज्ञात कारणे दुचाकीसह युवकांना नेले अर्धा किमी फरफटत

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडकदेत सुमारे अर्धा किलोमीटर दुचाकी फरफटत नेल्याची घटना आज दिनांक 29 मार्च 2025 रोज शनिवारला सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे.

घोगुलधरा कडून बोटोनी कडे येणाऱ्या दुचाकीला वणीकडून येणाऱ्या भरधाव कारने जबर धडक देऊन अक्षरशः अर्धा किलोमीटर अंतर मोटरसायकल सह फरफटत नेले. बोटोनी येथील सराटी रस्त्याजवळ असलेल्या गतिरोधक जवळ दुचाकी कार मधून निघाली आणि भरधाव कार चालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

सदर कार मध्ये दुचाकी अडकून असल्यामुळे घर्शनाने आग निघत होती.असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यामध्ये दुचाकीस्वार सतीश झिंगू आत्राम वय अंदाजे 35 वर्षे ,निलेश तुकाराम टेकाम वय अंदाजे 21 वर्षे रा.वाघदरा (वसंतनगर) ता.मारेगाव असे गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.



अपघाताची माहिती होताच रस्त्याने ये – जा करणाऱ्या नागरिकांनी व गावातील काही नागरिकांनी दोन्हीही जखमी तरुणांना करंजीला प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचारासाठी दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केल्याची माहिती मिळाली आहे. सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर