अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

बंदी वाढोणा येथील घटना

ज्ञानेश्वर आवारी झरी (जामनी)

झरी (जामनी) तालुक्यातील बंदी वाढोणा येथील शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून शेतकरी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोज गुरुवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वसंत नरसिंग चव्हाण वय अंदाजे 40 वर्षे असे वीजअंगावर पडून ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकरी वसंत हे आज सकाळी शेतात पराठ्या काडण्याचे काम करीत होता.गेल्या दोन दिवसापासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.पण आज सकाळी बंदी वाढोणा परिसरात अचानक रिमझिम पाऊससाला सुरुवात झाली होती.

अशातच आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला व शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळली. यात शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला.सदर घटनेने बंदी वाढोणा व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृतक शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!