ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

आजादी का अमृत महोत्सवानिमित्य
झरी येथे तालुका स्तरीय आरोग्य मेळावा

98 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
झरी जामणी तालुका परिसरातील जनतेकरीता मा.डॉ. राजकुमार चव्हाण उपसंचालक आरोग्य सेवा अकोला, मा.डॉ. आर. डी. राठोड, जि.श.चि.सा.रु. यवतमाळ व मा. डॉ. पी. एस. चव्हाण (जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ) यांचे मार्गदर्शनाखाली भव्य तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन दि.२०/०४/२०२२ रोज बुधवार ला सकाळी १० ते ४ वाजता पर्यंत करण्यात आलेले आहे. या शिबीरामध्ये आदिवासी नक्षलग्रस्त अती दुर्गम भागातील रुग्ण हे जिल्हा स्तरावर जाऊ शकत नाही. त्यांचेसाठी ग्रामीण रुग्णालय, झरीजामणी येथे तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. कारमोरे(ग्रा.रु.झरी)यांनी केले आहेत.

• शिबिरामध्ये हायड्रोसिल हर्निया, अपेन्डीक्स व शरीरावरील इतर गाठींचे निदान व उपचार करण्यात येणार आहेत.अस्थी रुग्णांची तपासणी करून निदान व उपचार करण्यात येईल.

• दंत विकार, मुख रोग व कर्क रोग असणाऱ्या रुग्णांची तपासणी करुन उपचार करण्यात येईल.

शिबीरामध्ये बाल रुग्ण, कुपोषित बालक, मतीमंद बालक, शालेय आरोग्य तपासणी मधील बालक, बालकांचे जन्मत: सर्व आजारांवर तज्ञांकडून निदान व उपचार करण्यात येईल. ● शिबीरामध्ये स्त्री रुग्णांचे गरोदर मातेची तपासणी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या गाठी, पाळीचा त्रास, या सर्वांचे निदान व उपचार केल्या जातील.

• मोतिबिंदू व डोळ्यांचे इतर आजारांचे निदान व उपचार करण्यात येतील. ● नाक, कान व घसा यांचे विविध आजार यांचे निदान व उपचार करण्यात येतील.

• मधूमेह, रक्तदाब, हृदयविकारांचे रुग्ण व इतर आजारांचे निदान व उपचार करण्यात येतील. • शिबिरामध्ये रक्ताच्या विविध चाचण्या व HIV व सिकलसेल तपासणी निःशुल्क केल्या जातील.

● ३० वर्षावरील सर्व रुग्णांचे रक्तदाब व शुगर तपासणी निशुल्क केल्या जाईल.
मानसिक आजारावर मार्गदर्शन व उपचार केल्या जाईल.
या शिबीरामध्ये पात्र नागरीकांची महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची नोंदणी,जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करण्यात येईल.
करून प्रधानमंत्री शिबिरामध्ये महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत खाजगी रुग्णालयातील विशेषतज्ञ व
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील विशेषतज्ञ सेवा देणार आहेत.
तथा सर्व वैद्यकिय अधिकारी व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, व इतर आरोग्य कर्मचारी ग्रामीण रुग्णालय झरीजामणी व सर्व कर्मचारी प्रा. आ. केंद्र तालुका झरीजामणी • रुग्णांसाठी अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात येणार आहेत आहे.

झरी तालुक्यातील अति दुर्गम भागातील नागरिक जिल्हास्तरावर जाऊन उपचार करू शकत नसल्याने.या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून,गरजु रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच नोंदणी करण्यासाठी आप-आपल्या प्रा. आ. केंद्रामधील वैद्यकिय अधिकारी अथवा ग्रामीण रुग्णालय, झरीजामणी येथे नोंदनि करावे.
  -डॉ कारमोरे(ग्रा.रु.झरी)

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर