ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

पाटण येथे भीषण पाणी टंचाई

397 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आठ दिवसापासून पाण्याविनाच

ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष

ज्ञानेश्वर आवारी झरी (जामनी)

झरी तालुक्यातील बाजारपेठ असलेल्या पाटण गावातील नागरिकांना पाण्याचा भीषण सामना करावा लागत आहे.मागील आठ दिवसापासून ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दारोदारी भटकंती करावी लागत आहे.

आठ दिवसापासून पाण्याची टंचाई असून सुद्धा कोणतीही उपाययोजना केली नसल्यामुळे नागरिक ग्रामपंचायत प्रशासनातील कर्मचाऱ्यांना व सदस्यांना संतप सवाल करीत असून याकडे मात्र ग्रामपंचायत सरपंच सचिव व सदस्य दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

तालुक्यातील बाजारपेठ व मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत कडून पाण्याची व्यवस्था म्हणून गावामध्ये पूर्वीपासून मोठ्या पाण्याच्या टाक्या आहे.व त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पैनगंगा नदी पात्रामधून पाटण येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये आणले जाते प्रत्येक घरी पाणी पुरवल्या जात होते.

परंतु मागील आठ दिवसापासून नदीपात्रात गाड असल्याचे सांगून  नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार ग्रामपंचायत कडून होताना दिसून येत आहे.ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही टँकरची सुविधा करण्यात आली नाही.

गावामध्ये खाजगी पाणी टँकर असून त्या खाजगी पाणी टँकरने स्वतः करिता व वार्डातील काही नागरिकांसाठीच पाणी मिळत आहे.
पाटण येथील घरगुती खाजगी बोरवेल ला सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये पाणी नसल्याने त्यांना सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी टंचाईची उपाययोजना का करण्यात आली नाही? ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी पाटणवासीयां कडून होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर