ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चोपन येथील 35 वर्षीय युवा शेतकऱ्याची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

112 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव :- तालुक्यात आत्महत्येचे सत्र सूरूच आहे.काही दिवसाच्या विश्रांती नंतर आज आणखी एक आत्महत्या झाल्याने मारेगाव तालुका आता आत्महत्येसाठी प्रसिद्धीस येत आहे.आज दिनांक 22 मार्च 2023 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास चोपण येथे घटना उघडकीस आली असुन प्रवीण महादेव खिरटकर वय सुमारे 35 वर्ष रा.चोपण असे किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

A 35-year-old young farmer from Chopan committed suicide by consuming pesticides.

तो चोपण येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता व शेती सह मोलमजुरी करून जीवन जगत होता.त्यांच्या वडीलांच्या नावाने हीवरा (मजरा) शेतशिवरात 3 एकर शेती आहे.गेल्या काही वर्षांपासून होत असलेली सततची नापिकी व उत्पन्नात होत असलेली घट यामुळे ते आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्या केल्याची शक्यता आहे.तो आज सकाळी नेहमीप्रमाणे तो आपल्या शेतात पशुधनाला चारा पाणी करण्यासाठी गेला होता.

त्याने शेतात असलेल्या बंड्यात ठेवून असलेले प्रोपेक्स सुपर किटकनाशक प्राशन केले.त्यांचा लहान भाऊ शेतात येताच प्रवीण हा शेतातील बंड्यात निपचित पडून असल्याचे दिसताच घटना उघडकीस आली.त्याने लगेच प्रवीण याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पण प्रकृती चिंताजनक असल्याने मारेगाव येथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचाराठी वणी येथे हलविण्याचा सल्ला दिला पण वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी ही घटना नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे.प्रवीण यांच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ असा आप्त परिवार आहे.
असुन बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर