ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मदनापुर येथील 57 वर्षीय इसमाची गळफास घेवुन आत्महत्या.

93 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असुन काही दिवसांच्या विश्रांती नंतर आज आणखी एक आत्महत्या झाल्याने मारेगाव तालुका आता आत्महत्येसाठी प्रसिद्धीस येत आहे.पण त्या रोखण्यासाठी कुटल्याच उपाय योजणा केल्या जात नाही ही शोकांकिता आहे.

सविस्तर वृत्त असे की.
मदनापुर येथे काल दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोज शनिवारला रात्रीच्या सुमारास मदनापुर येथे ही घटना घडली असुन हरीदास बाजीराव गेडाम वय सुमारे 57 वर्ष रा.मदनापुर असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव असुन तो आपल्या कुटुंबियांसोबत मदनापुर येथे राहत होता आणि शेत मजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

हरीदास हे काल रात्री कुटुंबिया सोबत 9 वाजताच्या सुमारास जेवण करून झोपले होते.त्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील टिनाच्या शेड मध्ये असलेल्या लोखंडी यांगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवली मध्य रात्रीच्या 2 वाजताच्या सुमारास कुटुंबातील काही सदस्य उठले असता त्यांना ते लटकून असलेला अवस्थेत दिसले त्या मुळे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोज रविवारला घटना उडकीस आली.

तालुक्यात होत असलेल्या आत्महत्या हा आता चिंतनीय विषय झाला असून आत्महत्येना आळा कसा बसेल यावर उपाय शोधणे गरजेचे बनले आहे. तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.हरीदास यांच्या पश्चात पत्नी,चार विवाहित मुली नातवंड असा आप्त परिवार आहे.

या घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असुन बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली जामदार आनंद अचलवार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर