ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वीज पडून म्हैस ठार

1.8k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेतकऱ्याचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान

वेगाव येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर असलेल्या एका झाडाखाली उभ्या असलेल्या एका म्हशिवर वीज कोसळली. यात म्हैस जागीच ठार झाली. सदर घटना काल  दिनांक 27 मे 2025 रोज मंगळवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास  घडली. यात शेतकऱ्याचे अंदाजे 80 हजाराचे नुकसान झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.

वेगाव येथील अरुण नानाजी टोंगे यांच्याकडे 5 एकर शेती आहे .ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.उन्हाळा असल्यामुळे शेतात कोणतेही पीक नसल्याने त्यांची म्हैस शेतामध्ये चरायला नेऊन सोडली होती.

अशातच काल दि.27 मे ला दुपारी 4:30 वाजताच्या  दरम्यान आकाशात ढग दाटून आले.आणि अचानक वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.पाऊसही लागला.त्यामुळे शेतातील म्हैस हिने घराचा रस्ता धरला.आणि गावातील जि.प.शाळे जवळ असलेल्या कर्माचा झाडाखाली उभी राहिली.

अशातच वीज चमकली आणि कर्माचा झाडाखाली उभ्या असलेल्या म्हशीवर पडली.यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला.अचानक घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक डोंगर कोसळले असून शासनाकडून मोठया मदतीची अपेक्षा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर