ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हटवांजरी येथील धरणासाठी अधिग्रहीत जमिनिचा मोबदला नविन धोरणानुसार मिळावा…

55 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

<<< हटवांजरी येथील शेतकऱ्यांची मागणी>>>

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184

         सविस्तर वृत्त असे की…
हटवांजरी येथील भुसंपादन 7/12/2013 यातील शेत गट क्र.81,83,84,85,86,87,88,89,90,91, 92व 93 याचा फेरफार महाराष्ट्र शासनाच्या नावाने आमची लेखी समती घेतल्या शिवाय घेण्यात येवू नये असी तक्रार तहसील कार्यालय मारेगाव येथे आज सोमवार दिनांक 28/2/2022 ला देण्यात आली आहे.

सिंचन धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला शासनाच्या  नवीन धोरणानुसार मिळावा म्हणून न्यायालयीन लढाई सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने प्रकल्प ग्रस्ताच्या जमिनीचा फेरफार करण्याची प्रक्रिया सुरू केल्या संदर्भात
  हटवांजरी-सराटी शिवारात सिंचनासाठी धरण बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला.यासाठी या दोन गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमीन खरेदी करून अधिग्रहित केलीआहे

या पैकी सहा शेतकऱ्यांना शासनाच्या नवीन धोरणा नुसार चौपट पटीने नुकसानीचा मोबदला दिला.तर उर्वरित शेतकऱ्यांची जमीन जुन्या धोरणा नुसार अल्प दरात खरेदी केली.त्यामुळे या शेतकऱ्यांचे एकरी सहा ते साडेसहा लाख रुपये नुकसान झाले आहे
त्यामुळे बाबा नानाजी भोयर,विलास विनायक वासाडे, योगराज निळकंठ कालेकर ,वसंता गणपत वासाडे, पुरुषोत्तम रामराव वासाडे,नारायण नामदेव लांडे, विनोद वसंतराव वासाडे , गणेश मारोती जुनगरी, गुलाब गणपत वासाडे, मोहन संभाजी लांडे या शेतकऱ्यांनी भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण नागपूर यांचेकडे वाढीव मोबदल्यासाठी केस दाखल केलीआहे.

        हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाच जिल्हा सिंचन विभागाने आता पुन्हा या शेतकऱ्यांना नोटिसा बजावून अधिग्रहित जमिनीच्या फेरफार करण्या बाबत आक्षेप मांगीतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यात असंतोष असून आम्ही शेत जमिनीचा मोबदला न घेता आमच्या जमिनीचा फेरफार कशा काय होऊ शकतो? असा प्रश्न हे शेतकरी विचारीत असून या अन्याया विरुद्ध या 10 शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय मारेगाव येथे तक्रार दाखल केली आहे. आणि फेरफार परस्पर शासनाचे नावाने घेण्याची कारेवाई तलाठी हटवांजरी यांचे मार्फत होणार आहे अशे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर