ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कल्याणमधील भीषण अपघातात रीलस्टार प्रेम भाटीचा मृत्यू:कुटुंबावर शोककळा, रस्त्यावरील खडी अन् खड्ड्यांमुळे दुचाकी घसरल्याचा आरोप

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोशल मीडियावर आपल्या विनोदी आणि हॉरर रील्स तयार करणारा प्रेम भाटीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास कल्याणमधील मोहने परिसरात रस्त्यावरील खड्डे आणि खडीमुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने प्रेम भाटीचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी 13 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घरी परतत होता. मोहने येथील शिवसेना शाखेजवळून जात असताना रस्त्यावर पडलेले खड्डे आणि विखुरलेली खडी त्याच्या अपघाताला कारणीभूत ठरली. खड्ड्यांमुळे दुचाकीवरून त्याचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर जोरात आदळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे एका तरुणाचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. रिक्षा युनियनचे अध्यक्ष शिवाजी पाटील म्हणाले की, रस्त्यावर पसरलेली खडी आणि खड्ड्यांमुळे हा अपघात झाला आहे. जबाबदार कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. रस्ते दुरुस्तीमधील हलगर्जीपणा निष्पाप नागरिकांचा जीव घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सोशल मीडियावरील चाहत्यांमध्ये हळहळ प्रेम भाटी त्याच्या कॉमेडी आणि हॉरर रील्समुळे तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. इंस्टाग्रामवर त्याचे 83 हजार फॉलोवर्स, तर युट्यूबवर तब्बल 1.7 मिलियन (17 लाख) सबस्क्रायबर्स होते. त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. प्रेमचे वडील कमल यांचे हेअर स्टाईलचे दुकान असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण कलाकाराच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपतीपुळेला जाणाऱ्या मित्रांचा भीषण अपघात दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तीन मित्रांच्या पर्यटनाचा प्रवास अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारा ठरला आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे निघालेल्या या मित्रांच्या चारचाकी कारचा मध्यरात्री कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बीड जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुण अभियंत्याचा/कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर