ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

सातारा जिल्हा बनतोय ड्रग्सचा अड्डा!:सावरीनंतर आता पाचगणीतून 5 लाखांचे कोकेन जप्त, 10 जणांना अटक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून विविध ठिकाणी ड्रग्सचे साठे आढळून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये देखील अशीच घटना उघडकीस आली आहे. पाचगणी पोलिसांनी वाहन तपासणीवेळी एका गाडीतून तब्बल 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचगणीत अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गोपनीय मानीती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी दरम्यान एका गाडीतून कॅप्सुलसह 13 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास 5 लाख रुपये किंमत आहे. तसेच या गाडीतून ताब्यात घेण्यात आलेल्या इतर सामग्री मिळून एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी 10 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी हे पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते. तसेच आता पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यात आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? या दिशेने सातारा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील सावरी गावात 45 किलो ड्रग्स जप्त सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्सचा साठा सापडला होता. या ड्रग्सची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेजयशमधून जेवण जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर