ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ:पुण्यतिथी महोत्सवादरम्यान पंकज महाराज पोहोकार यांचे निरुपण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोणतेही अवडंबर न करता एक गाडगं, एक काठी, कानात कवडी व अंगावर चिंध्या पांघरुण या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून काढून ख-या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ होते, अशी माहिती हभप पंकज महाराज पोहोकार यांनी त्यांच्या किर्तनातून मांडली. श्री संत गाडगेबाबा यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव बाबांच्या समाधीस्थळी सुरु आहे. यावेळी सादर झालेल्या प्रथम कीर्तनसेवेत हभप पंकज महाराज पोहोकार यांनी गाडगेबाबांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांच्या मते आज देवाला सुद्धा आदर्श माणसाची गरज आहे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर होणे सोपे झाले, पण माणूस होणे कठीण झाले आहे. यावेळी त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांची एक कविताही सादर केली. ती अशी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी.. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी, ही देव देवळे सारी फिरून आलो.. भिंतीपल्याड त्यांच्यात माणूस शोधतो मी. महाराजांच्या सांगण्यानुसार गाडगेबाबांचे किर्तन हे उत्तम, आदर्श, सुसंस्कृत माणूस बनवण्याचा कारखाना आहे. स्वछता, देव ,धर्म, अंधश्रद्धा, रूढी आणि माणूस हे विषय त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. देवधर्म व देवधर्म सांभाळा हा काळाचा इशारा आहे. म्हणून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे ईश्वर स्मरणच आजच्या तरुण पिढीला व समाजाला वाचवू शकते, असेही पोहोकार महाराज यांनी सांगितले. दरम्यान गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा दुसरा दिवसदेखील पुरणपोळीने साजरा झाला. अंध, अपंग, निराश्रित वृद्धांना जेवन वितरित करण्यात आले. आश्रयदाते कुऱ्हे आप्पाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अन्नदान करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्यासह संस्थेचे सागर देशमुख, भरतभाऊ रेडे, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, किशोर चौधरी, सुधीर धोंगडे, विठ्ठल तेलमोरे, अतुल रेडे, गजानन देशमुख आदींनी परिश्रम घेतले. काळमेघ यांनी दिली भेट श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंतराव काळमेघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गाडगे बाबांच्या समाधिस्थळी भेट दिली. यावेळी सर्वांनी समाधीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम हेमंतराव काळमेघ यांच्या हस्ते गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी चंद्रशेखर खेडकर, प्रकाश गवळी, डॉ. ए टी देशमुख, संदीप पुंडकर, प्रभजीतसिंह बछेर, प्रा. डॉ. स्वप्निल देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर