ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

रब्बीची 75% पेरणी; शेतकऱ्यांचा मका, गहू, हरभऱ्यांकडे अधिक कल:थंडी ठरतेय पिकांसाठी वरदान, मात्र योग्य काळजी आवश्यक‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रब्बी हंगामात पडणारी थंडी ही पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळांची वाढ मजबूत होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. मात्र, हीच थंडी अती झाली किंवा व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. तालुक्यात रब्बी हंगामासाठी एकूण २६ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र आहे.पैकी आतापर्यंत सुमारे १६ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत जवळपास ७५ टक्के रब्बीच्या पेरणीचे काम झालेले असून, एखाद्या आठवड्या पर्यंत उर्वरित क्षेत्रावरील पेरण्याही पूर्ण होऊन १०० टक्के होतील. थंडीचा सर्वाधिक फायदा गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा या पिकांना होतो. या पिकांमध्ये थंड वातावरणात फुटवे चांगले येतात. पाणी शिवारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा यावर्षी अंजनी धरण व गिरणा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गिरणेचे आवर्तन शेत शिवारापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तर अंजनीचे पाणी सिंचनासाठी या दोन्हींचा उपयोग रब्बी क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो, परिणामी रब्बी हंगामातील उत्पन्नात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. ज्वारी १ हजार ५६९ हेक्टर, गहू २ हजार ५८० हेक्टर, मका ६ हजार ९४५ हेक्टर, हरभरा २ हजार ४६३ हेक्टर, रब्बी कांदा ३ हजार २०० हेक्टर याप्रमाणे आतापर्यंत रब्बी पेरण्या झालेल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर