ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

ठाकरे बंधुंची युती ‘प्रीतिसंगम’ नाही तर ‘भीतीसंगम’:नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात, पैसे वाटले असल्यास पुरावे देण्याचे आव्हान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला ‘प्रीतिसंगम’ असे गोंडस नाव दिले असले, तरी प्रत्यक्षात हा ‘प्रीतिसंगम’ नसून मुंबई महापालिका गमावण्याच्या धास्तीने झालेला ‘भीतीसंगम’ आहे, अशी बोचरी टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी आज केली. “ज्यांनी आपल्या सख्या भावाला घराबाहेर काढण्याचे पाप केले, त्यांना आता अस्तित्वाच्या लढाईत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच भावाची आठवण झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. नवनाथ बन म्हणाले की, “दोन भाऊ भीतीपोटी एकत्र येत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईचा जो विकास झाला, तो पाहून मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे आहेत. मुंबई महापालिकेत आपला पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यामुळेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

याला प्रीतिसंगम म्हणून नावाची बदनामी करू नका.” राज ठाकरेंची ६० जागांवर बोळवण करण्याचा उबाठाचा प्रयत्न या युतीमधील जागावाटपाच्या तिढ्यावरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. “राज ठाकरे यांना फक्त ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न ‘उबाठा’ गटाकडून सुरू आहे. मात्र, राज ठाकरे ६० जागांवर समाधानी होतील असे वाटत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार, मनसे किमान १०० जागांची मागणी करत आहे.

त्यामुळे ही युती उद्याच होईल की नाही, याची खात्री नाही. मुळात ही युती झाली तरी १६ जानेवारीला मुंबई महापालिकेवर भाजप आणि महायुतीचाच भगवा फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरावे देण्याचे संजय राऊतांना आव्हान नगरपालिका निवडणुकीत महायुतीने पैशांची उधळपट्टी केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांचा नवनाथ बन यांनी समाचार घेतला. “फुकटची बडबड करणे ही संजय राऊतांची जुनी सवय आहे. जर खरोखरच कोट्यवधी रुपये उधळले गेले असतील, तर राऊतांनी एखादा कच्चा चिठ्ठा, व्हिडिओ क्लिप किंवा ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर करावी.

केवळ हवेत आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत.संजय राऊत देखील निवडणुकीत कशापद्धतीने पैशांची उधळपट्टी करत आहेत? कशाप्रकारे भ्रष्टचारा महाराष्ट्रात केला? हे जनतेला ठाऊक आहे,” असे आव्हान त्यांनी दिले. जनता ‘देवाभाऊ’ आणि शिंदेंच्या पाठीशी कालच्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे.

महायुतीला मिळालेले हे यश म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असून, मुंबईतही भाजपचाच विजय होईल, असा दावा नवनाथ बन यांनी यावेळी केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर