ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मतांसाठी काहीही!:अमित साटम यांनी स्वतः ‘बूट पॉलिश’ करत वेधले लक्ष; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना जनतेच्या चरणी लीन होताना आपण पाहतोच, पण मुंबईत भाजप आमदार अमित साटम यांनी तर थेट ‘पायालाच’ हात घातला आहे. सोमवारी साटम यांनी चक्क बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या जागी बसून त्यांचे बूट पॉलिश केले. नेत्याचा हा ‘बूट पॉलिश’ अवतार सध्या मुंबईत चांगलाच चर्चेचा आणि तितकाच उपरोधाचा विषय ठरत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या प्रचाराची रणनीती आक्रमक केली असून, तळागाळातील कष्टकरी वर्गाला साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज दादर येथे आयोजित रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी साटम यांनी केवळ भाषण न करता, स्वतः बूट पॉलिश करून कामगारांच्या श्रमांप्रती आदर व्यक्त केला. या अनोख्या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रेल्वे स्थानकांवर रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बूट पॉलिश कामगारांच्या मेळाव्यात अमित साटम यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या या कष्टकरी वर्गाच्या आरोग्याच्या समस्या, हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. कामगारांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता ठोस कृतीतून ते सोडवण्याचा विश्वास साटम यांनी दिला. तिकिटाची वाट पाहू नका, कामाला लागा मेळाव्यानंतर भाजपच्या निवडणूक संचलन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. कोणाला तिकीट मिळेल किंवा उमेदवार कोण असेल याची वाट बघत बसू नका, आता थेट कामाला लागा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईत पक्षाचा ‘घरोघरी प्रचार’ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. 27 समित्यांकडे प्रचाराची धुरा निवडणुकीचे नियोजन अत्यंत सूक्ष्म स्तरावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. प्रचाराचे नियोजन, सभांचे आयोजन आणि रणनीती ठरवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक प्रभागात पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर