ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

नांदेड हादरले!:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपहरण करून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असतानाच, आज नांदेडमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे भरदिवसा अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नांदेडच्या सिडको भागात घडली. जीवन घोगरे पाटील हे परिसरात असताना अचानक एका चारचाकी वाहनातून आलेल्या काही अज्ञात इसमांनी त्यांना गाठले आणि बळजबरीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये अपहरणकर्त्यांची गाडी सुसाट वेगाने निघून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. अपहरणकर्त्यांनी घोगरे पाटील यांना अज्ञात स्थळी नेऊन तिथे त्यांना लाकडी दांडके आणि इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराला मोठ्या दुखापती झाल्या आहेत. मारहाणीनंतर हल्लेखोरांनी त्यांना सोडून दिले. त्यानंतर घोगरे पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, हे अपहरण नेमके कोणत्या कारणातून झाले? वैयक्तिक वैमनस्य की राजकीय वाद? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या संशयास्पद वाहनाचा आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर