ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद का होऊ शकत नाही?:MIM नेत्याचा सवाल; मुंबईत ठाकरे गट व एमआयएमची छुपी युती – भाजप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सध्या सत्ताधारी महायुती व विरोधी पक्षांमध्ये सुंदोपसुंदी माजली आहे. विशेषतः ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर मराठीच होईल असे ठणकावून सांगत मुंबईतील मराठी जनतेला आपल्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यातच एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद व अन्सारी का होऊ शकत नाही? असा सवाल करत रान अधिकच पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होतील. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर येथील सत्ता व महापौरपद स्वतःकडे राखण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांत कुरघोडी रंगली आहे. या पार्श्वभूमीवर वारीस पठाण यांनी उपरोक्त सवाल केला आहे. प्रथम पाहू काय म्हणाले वारीस पठाण? वारीस पठाण म्हणाले, मुंबईचा महापौर पठाण, शेख, सय्यद, अन्सारी का होऊ शकत नाही? संविधानात तर समानता आहे ना? सर्वांना बरोबरीचा दर्जा, हे संविधानच वाचत नाहीत. यांना काही माहितीच नाही. यांचे केवळ एकच काम आहे. देशात द्वेष पसरवणे, मतांचे ध्रुविकरण करणे व मुस्लिमांना कोणत्याही पद्धतीने शिवीगाळ करणे. यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही. यांना विकासासंदर्भात प्रश्न विचारला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. महाराष्ट्रात एवढे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांना पॅकेज केव्हा देणार? सरकारला प्रश्न विचारा. त्यांच्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढला. त्यावरही त्यांच्याकडे उ्ततर नाही. ठेकेदारांवर कोणतीही कारवाई होत नाही. यांच्याकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्त नाही. केवळ एकच गोष्ट ध्रुविकरण. मुंबईचा महापौर. जिसको मुंबई में रहना है, ये कहना है. अरे काय मुंबई कुणाच्या बापाची जहागीर आहे का? मुंबई सोडा म्हणणारे तुम्ही कोण? असा खडा सवाल वारीस पठाण यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. ठाकरे गट – एमआयएमची छुपी युती – भाजप दुसरीकडे, भाजपने वारीस पठाण यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत ठाकरे गट व एमआयएमची छुपी युती झाल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, उबाठा एमआयएम छुपी युती? मुंबई महापालिकेत पठाण, खान, कुरेशी, शेख, अन्सारी किंवा एखादी हिजाबधारी महिला महापौर होऊ शकते, हा सूर अचानक उमटलेला नाही. तो उबाठा गटाच्या नव्या, दिशाहीन राजकारणातूनच जन्माला आला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि एमआयएमसारख्या पक्षांमध्ये छुपी मोर्चेबांधणी सुरू आहे का, याकडे मतदारांनी अत्यंत सावधपणे पाहणे गरजेचे आहे. ही हातमिळवणी काल-परवा झाली नाही, तर तीन वर्षांपूर्वीच तिची पायाभरणी झाली होती का? 2022 च्या राज्यसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेला एमआयएमने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड म्हणूनच आज महापौरपदाचे गाजर पुढे केले जात नाही ना? या प्रश्नांची स्पष्ट, थेट आणि निर्भीड उत्तरे उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली पाहिजेत. मराठी माणसाच्या नावावर मते मागायची, भावनांचे राजकारण करायचे आणि सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर मात्र बिगरमराठी परप्रांतीयांना बसवायचे—हेच ठाकरेंचे खरे राजकारण आहे, हे मुंबईकरांनी विसरू नये. मराठी माणसा, तुझ्या नावावर सत्ता मिळवून तुझ्याच पाठीत खंजीर खुपसण्याचा हा कट ओळख. वेळीच सावध राहा, कारण आज मौन म्हणजे उद्याचा पश्चात्ताप ठरू शकतो, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर