ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

गौतम अदानी बारामती दौऱ्यावर:रोहित पवार बनले सारथी, तर शेजारी बसले अजितदादा; ‘शरद पवार एआय सेंटर’चे उद्घाटन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय प्रवाहात दोन टोकांवर असलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले. गौतम अदानी यांच्या स्वागतापासून ते मंचापर्यंत संपूर्ण पवार कुटुंबाने उपस्थिती लावल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. गौतम अदानी यांचे बारामतीत आगमन होताच रोहित पवार आणि अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. आमदार रोहित पवार यांनी स्वतः गौतम अदानी यांच्या कारचे सारथ्य केले, तर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. या गाडीतून अदानी विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य अदानींच्या स्वागताला हजर होते.
शरद पवार,अजित पवारांच्या मध्ये अदानींची खुर्ची ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे उद्घाटनावेळी शरद पवार, अजित पवार, सुनेत्र पवार, सुप्रिया सुळे हे सर्व एकाच मंचावर बसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार आणि शरद पवार दोघांच्या मध्ये गौतम अडाणी यांची खुर्ची ठेवण्यात आली होती. गौतम अदानींनी यापूर्वीही दिली बारामतीत भेट ज्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे आज उद्घाटन झाले, ते केंद्र पूर्णपणे अदानी समूहाने दिलेल्या निधीतून उभारण्यात आले आहे. पवार कुटुंब चालवत असलेल्या ‘विद्या प्रतिष्ठान’ या नामांकित शैक्षणिक संस्थेअंतर्गत हे केंद्र काम करणार आहे. २०२२ मध्येही गौतम अदानी यांनी पत्नीसह बारामतीला भेट देऊन ‘विज्ञान आणि नवोन्मेष क्रियाकलाप केंद्रा’च्या उद्घाटनात सहभाग घेतला होता. मात्र, आजचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट आणि शरद पवार गट) पुन्हा एकदा आघाडी किंवा जवळिकीबाबत वेगवान घडामोडी घडत आहेत. हे राजकारण नाही, तर समाजकारण – रोहित पवार काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सतत टीका होत असताना, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे एकत्र येणे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात आहे. या भेटीवर राजकीय टीका होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील भेटी या प्रामुख्याने सामाजिक कार्यासाठी असतात. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे.” आजच्या भारतात AI चा अर्थ ‘अदानी इन्फ्लुएन्स’ दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या सोहळ्यावर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, “आजच्या भारतात AI चा अर्थ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ नसून ‘अदानी इन्फ्लुएन्स’ (Adani Influence) असा झाला आहे.”

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर