ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

सांगोल्यात गावगुंडांकडून दहशत!:काही जणांना तलवारीने मारहाण; आमदार बाबासाहेब देशमुखांचे आंदोलन, गुंडांना अटक करण्याची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले असून, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळा गटात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) प्रणित सांगोला तालुका विकास आघाडीने विजय मिळवला आहे. मात्र, या विजयानंतर कोळा येथे स्थानिक आणि सांगलीतील काही गुंडांनी तलवारींच्या साहाय्याने धुमाकूळ घालत ग्रामस्थांवर हल्ले केल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने कोळा येथे धाव घेतली असून, या गुंडांवर कठोर पोलिस कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी तेथे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू केले आहे. कोळा येथील मुख्य चौकात शेकडो ग्रामस्थांसह आक्रमक पवित्रा घेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित गावगुंडांना अटक होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा सज्जड इशारा दिला आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी लागलेल्या जिल्हा परिषद निकालांनंतर ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर नागरिकांवर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत पोलिस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या निर्धारावर आमदार आणि ग्रामस्थ ठाम आहेत. सांगोला तालुक्यातील कोळा येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि पुरुष ग्रामस्थांना सांगली व स्थानिक गुंडांकडून तलवारीने बेदम मारहाण करण्यात आली. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोळा येथील मुख्य चौकात 4 ते 5 हजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे. पोलिसांनी या गुंडांना पाठीशी घातल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा इशारा आमदार देशमुखांनी प्रशासनाला दिला आहे. या प्रकरणाची दखल घेत आमदार देशमुखांनी पोलिस प्रशासनाला 24 तासांचा अल्टिमेटम दिला असून, विहित वेळेत कारवाई न झाल्यास आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. जर गुंडांवर कारवाई झाली नाही, तर स्वतः आमदार सांगोला पोलिस स्टेशनसमोर आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी डीवायएसपी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. सध्या घटनास्थळी प्रचंड जनसमुदाय जमलेला असताना, कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन आमदार देशमुखांनी केले आहे. मात्र गुन्हेगारांना जोपर्यंत जेरबंद केले जात नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही यावर ते ठाम आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर