ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

घरकुलाच्या हप्त्याचा वाद:सेनगावात भाजप पदाधिकाऱ्याचा लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सेनगाव पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ येथे गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजना राबवली जात असून त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयातील पाचही तालुक्यांमधून सुमारे ३ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड झाली असून काही जणांना घरकुलाच्या अनुदानाचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला तर काही जणांना अद्यापही अनुदानाचा हप्ता दिलाच नाही. दरम्यान, घरकुल मंजूर झाल्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून ठेवली आहेत. मात्र आता अनुदानाचा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थ्यांना घराच्या बाजूने मेनकापडाच्या फाऱ्या बांधून रहावे लागत आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून यामुळे लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. घरकुलाचे हप्ते शासनस्तरावरून ऑनलाईन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाभार्थ्यांकडून बँकेत चकरा वाढू लागल्या आहेत. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील पळशी गावातील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदानाचे हप्ते मिळाले नसल्याने भाजपाचे अनुसुचीत जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर खिल्लारे यांनी लाभार्थ्यांसह प्रभारी गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ता. ५ जानेवारी पर्यंत अनुदानाचे हप्ते न मिळाल्यास लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या शिवाय काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, नंदू पाटील, ॲड. पोले, बबन डुकरे, नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांची भेट घेऊन सुमारे १५०० लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते का पडले नाहीत याबाबत जाब विचारला. सदर हप्ते तातडीने बँक खात्यात जमा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर