ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

आपल्या स्वतःतील परमेश्वर ओळखला‎ की चित्तवृत्ती शांत होते- रामेश्वर महाराज‎:चारीधाम यात्रा पूर्ण केलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन, कीर्तन सोहळा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | कन्नड चराचरातच नव्हे तर प्रत्येकात परमेश्वर आहे तो ओळखण्याची गरज आहे. एकदा का तो ओळखला की सैरभैर झालेल्या चित्तवृत्ती आपोआप शांत होतात, असे प्रतिपादन रामेश्वर महाराज यांनी भिल्ल पलटण येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात केले. भिल्ल पलटण येथे चारीधाम यात्रा पूर्ण करून आलेल्या भाविकांच्या स्वागतार्थ गंगापूजन व भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. चारीधाम यात्रा करून आलेले भाविक गोरखनाथ पुंजाबा पाटील आल्हाड, निर्मलाबाई गोरखनाथ पाटील आल्हाड, केशवराव रामराव राजापुरे, रुक्माई केशवराव राजापुरे, सरस्वतीबाई शामराव राजापुरे, जिजाबाई विश्वनाथ आल्हाड, वच्छलाबाई काशिनाथ आल्हाड यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यांच्या स्वागतार्थ आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन कार्यक्रमात भागवताचार्य रामेश्वर महाराज यांनी आपल्या वाणीतून भक्तिरसपूर्ण कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. हरिनामाच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात परिसर भक्तिमय झाला होता. या कार्यक्रमाला भाजप नेते, उद्योजक मनोज केशवराव पवार यांनी उपस्थित राहून चारीधाम यात्रा करून आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले. यावेळी आपल्या मनोगतात मनोज पवार म्हणाले की, चारीधाम यात्रा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी केलीच पाहिजे. विशेषतः तरुणपणी ही यात्रा केल्यास कठीण व अवघड वाटणारी यात्रा अधिक सोपी आणि आनंददायी ठरते. चारधाम यात्रेमुळे आध्यात्मिक समाधान मिळते तसेच जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. कार्यक्रमाला रोहिदास पाटील, पवन ठाकूर, नाना वाळुंजे, किशोर वाघ, साईनाथ आल्हाड, आकाश बोलधने यांच्यासह परिसरातील नागरिक, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर