ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शिवाजी महाराजांच्या फोटोवर BJP नेत्याचे स्टिकर:राम शिंदेंचा फोटो; विद्यार्थ्यांना दिलेल्या पॅडवरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या परीक्षेच्या पॅडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर भाजप नेत्याच्या फोटोचे स्टिकर चिकटवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात पॅडवर भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांचा फोटो असल्याचे दिसून येत आहे. राज्यात येत्या 15 तारखेला मुंबईसह 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना रोहित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथित अवमाननेशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक महिला परीक्षेच्या पॅडवर चिकटवलेले एक स्टिकर काढताना दिसत आहे. हे स्टिकर भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आहे. महिलेने ते स्टिकर काढल्यानंतर त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असल्याचे स्पष्ट होते. रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. चमकोगिरी करणाऱ्यांनी माफी मागावी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोवर माझ्या मतदारसंघात असे स्टीकर चिकटवून ते पॅड विद्यार्थ्यांना देऊन चमकोगिरी केली जात आहे. ही महाराजांची विटंबना असून ज्यांनी केलं आणि ज्यांच्यासाठी केलं ते सगळेच याला जबाबदार आहेत. या प्रकरणी संबंधितांनी तातडीने जाहीर माफी मागावी, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. एमपीएससी परीक्षेवरूनही संताप रोहित पवारांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अवघ्या काही दिवसांवर आली असतानाही PSI वय वाढीचा निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच जाहिरात 7-8 महिन्यांनी उशिरा त्यात वय वाढीचा मुद्दा देखील सोडवायची तसदी घेतली गेली नाही. वय वाढीच्या निर्णयाबाबत सरकारने गेले आठ दहा दिवस विद्यार्थ्याना अंधारात ठेवले परिणामी नाईलाजाने आज विद्यार्थ्याना आंदोलन करावे लागत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो असून विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही यादृष्टीने पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलिस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल, ही अपेक्षा, असे त्यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर