ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मनोहर मामा प्रकरणाचे सूत कोल्हापूरपर्यंत; कोतोलीकरला अटक:4 दिवसांची कोठडी, एका आमदारांकडे आरोपी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या गुन्ह्याची पाळेमुळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर यास अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोतोलीकर हा एका आमदाराकडे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आल्याचे सांगितले जाते. घोटी येथील फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, मठात भेटण्यासाठी सुरुवातीला ११ हजार रुपये घेण्यात आले. त्यानंतर औषधाच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच तुमचा मुतखड्याचा आजार पूर्ण बरा करतो, असे सांगून लाल रंगाची पावडर देऊन फसवणूक केल्याची त्यांची तक्रार आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी अविनाश कोतोलीकर याला करमाळा पोलिस ठाण्यात सलग तीन दिवस चौकशीसाठी बोलवून चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवार दि. २८ मे रोजी अटक केली. त्यानंतर त्याला शुक्रवार दि. २९ मे रोजी करमाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आता त्याला सोमवार दि. १ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जादूटोणाविरोधी कायदा, आर्थिक फसवणूक व धमकावणे या प्रकरणी दि. ११ मे रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक झालेली आहे. तीन दिवस संशयिताची पोलिसांनी केली चौकशी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर