Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

नरसाळा येथे तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन

मा. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते शुभारंभ

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरसाळा येथे खेळ व कला संवर्धन मंडळ, पंचायत समिती मारेगाव यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सवाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

आमदार संजयभाऊ देरकर यांच्या गावात आगमनानंतर लेझीमच्या तालावर वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रीडा महोत्सवाचा ध्वज फडकावून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नरसाळा येथील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच कप बुलबुलच्या ध्वजाला मानवंदना देत शिक्षक व विद्यार्थिनींनी परेड सादर करून मान्यवरांना सलामी दिली.आमदार संजयभाऊ देरकर यांचे स्वागत नरसाळा ग्रामपंचायतीचे सरपंच संगीतराव मरस्कोल्हे व उपसरपंच यादवराव पांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मारेगावचे गटविकास अधिकारी मा. बी. बी. व्हनखडे होते. विशेष अतिथी म्हणून तहसीलदार मा. उत्तमराव निलावाड (मारेगाव) व ठाणेदार मा. प्रवीण सुळे (मारेगाव) उपस्थित होते.यावेळी मंचावर गटशिक्षणाधिकारी मा. स्नेहदीप काटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. एच. ए. राठोड, विस्तार अधिकारी मा. ज्ञानेश्वर देऊळकर, मा. झीत्रुजी ठाकरे,

कु. संगीताताई गारघाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. विजय उईके, उपाध्यक्ष सौ. वंदनाताई तिखट, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. किशोर भुसारी, पेसा कोष समितीचे अध्यक्ष मा. किशोर सुरपाम, स्टोन मायनिंग संघटनेचे अध्यक्ष मा. सुभाष मत्ते, जिल्हा संघटक मा. गजाननराव गायकवाड व जिल्हा संघटिका सौ. मनीषाताई तराळे (भारत स्काऊट गाईड, यवतमाळ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी शो-ड्रिल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत नरसाळा व ग्रामवासीयांच्या वतीने आमदार संजयभाऊ देरकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

हा तीन दिवसीय तालुकास्तरीय खेळ व कला महोत्सव दि. १ जानेवारी ते ३ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नरसाळाचे मुख्याध्यापक मा. बी. व्ही. ढवस सर व सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, स्टोन मायनिंग संघटना, आदिवासी जनजागृती युवा संघटना, राणी दुर्गावती महिला संघटना, सर्व महिला बचतगट, गुरुदेव भजन मंडळ, वारकरी संप्रदाय भजन मंडळ व समस्त ग्रामस्थ नरसाळा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!