ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन असून सध्या शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी हा गावातीलच सुमारे ३० वर्षीय युवक असून तो पीडितेच्या घरी नेहमी ये-जा करत होता. नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घरात कोणी नसताना आरोपीने वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

आरोपीने धमकी दिल्यामुळे भीतीपोटी पीडितेने हा प्रकार  कोणालाही सांगितला नव्हता. तिच्यामध्ये होत असलेल्या काही बदलामुळे तिच्या आईने मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वणी येथील एका खासगी रुग्णालयात नेले.तिथे तिची सोनोग्राफी तपासणी केली असता पीडित मुलगी अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पीडितेने आईकडे संपूर्ण प्रकार उघड केला.

आईने तात्काळ मुलीसह मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपीविरोधात BNS कलम 64(2), 64(2)(m), 65(1) तसेच POCSO कायद्यांतर्गत कलम 3(a), 4, 5(j), 5(l), 6 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर