ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

प्रत्येक गोष्टीत धर्म आणणे भाजपचा जुना फंडा:हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार; भाजपच्या जाहिरनाम्यात ‘टिपू’चा फोटो असल्याचा आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान वादात भाजपने केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. भाजपने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवू नयेत. प्रत्येक गोष्टीत जात व धर्म आणणे हा भाजपचा जुना फंडा आहे. या फंड्याच्या अनुषंगाने ते माझ्या विधानाला हिंदू-मुस्लिम अँगल देत आहेत. ते माफीवीरांच्या पक्षाचे असल्यामुळे माझ्याकडे माफीची मागणी करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यांच्या या तुलनेमुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवत माफीची मागणी केली आहे. सपकाळ यांनी आज रविवारी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, आम्हाला भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराज शिकण्याची गरज नाही. मी अत्यंत विनम्रपणे व तेवढ्याच स्वाभिमानाने सांगतो की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची आन – बान – शान आहेत. त्यांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या पराक्रमामुळेच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा थेट स्वरुपात आपल्या संविधानापर्यंत आहे. हा भाजपचा खोडसाळपणा काल पत्रकारांनी मला महामानवांचे विशेषतः शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो कार्यालयात लावण्यासंबंधी होणाऱ्या मागणीसंदर्भात प्रश्न केला होता. त्यावर मी माझे मत नोंदवत म्हणालो होतो की, शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार दिला आणि त्याचा आदर्श टिपू सुलतानने घेतला. याच आदर्शानुसार तो इंग्रजांच्या विरोधात लढला. मी या अनुषंगाने बोललो. पण माझ्या मूळ विधानाला बाजूला ठेवून जे विधान चालवले जात आहे ते भाजपचा खोडसाळपणा आहे. हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, प्रत्येक गोष्टीत जात व धर्म आणणे हा भाजपचा जुना फंडा आहे. या फंड्याच्या अनुषंगाने त्यांनी माझ्या एका जबाबदारपूर्ण विधानाला हिंदू-मुस्लिम अँगलने खतपाणी घातले. त्यांनी माझ्याकडे माफी मागण्याची मागणी केली आहे. ते माफीवीरांच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे. माझे विधान मला विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यातून शिवाजी महाराजांविषयीचा स्वाभिमान दिसून येतो. भाजपच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतानचा फोटो हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी भाजपवर महापालिका निवडणुकीत टिपू सुलतानचा फोटो वापरल्याचाही दावा केला. भाजपला निवडणुकीत टिपू सुलतान चालतो. त्यांच्या महापालिका निवडणुकीच्या जाहिरनाम्यात टिपू सुलतानचा फोटो होता. त्यांनी माझा फोटो जाळण्याऐवजी सावरकरांनी ‘शिवाजी महाराज यायला… कावळा बसायला आणि डांग तुटायला’ हे जे विधान केले होते त्याचा निषेध करावा. भाजप त्यांचा पुतळा जाळणार आहे का? महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी अत्यंत विकृत विधान केले. त्यामुळे भाजप त्यांचाही पुतळा जाळणार आहे का?, असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. हा संविधान संपवण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत एमआयएमची मदत घेतली. चंद्रपुरातही त्यांनी एमआयएमच्या मदतीने आपला महापौर बसवला. महाराष्ट्रात 21 ठिकाणी तुम्ही एमआयएमशी आघाडी केली, युती केली, मदत केली. ही गोष्ट आता लपून राहिली नाही. त्यामुळे काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षावर टीका करणे योग्य नाही. महापुरुषांच्या फोटोवर भाजपचे जे आक्षेप आहेत, तो संविधान संपवण्याचा एक डाव आहे, असे सपकाळ म्हणाले. सपकाळ पुढे म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावर ते मी त्यांना ओळख नसल्याचे म्हणाले. मी त्यांना जल्लाद म्हणालो. क्रूर असण्याच्या अनुषंगाने दरिंदा म्हणलो. त्यावेळीह त्यांनी मला ओळख दाखवली नाही. पण काल मात्र त्यांनी आवेशात येऊन माझ्यावर गरळ ओकली. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात जे मुलभूत मुद्दे आहेत आणि दिल्ली स्तरावर ज्या फाईल्समध्ये बरेच काही लपले आहे, त्यावरून ते इतरत्र लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर