ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश:सरकारचा मोठा निर्णय, जड गोण्या बंद

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करताना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर सरकारने हिरवा कंदील दिला आहे. माथाडी कामगारांना दररोज जड गोण्या उचलण्याचे काम करावे लागते. अनेकदा 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलताना त्यांच्या शरीरावर ताण येतो. यामुळे पाठदुखी, सांधेदुखी आणि इतर गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते. विशेषतः वय वाढल्यानंतर या त्रासाचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोण्यांच्या वजनावर मर्यादा घालणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनीही सांगितले होते. या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचाही मोठा वाटा आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जड वजन उचलण्यावर मर्यादा असावी, असा निर्णय यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला होता. केंद्र सरकारनेही यासंदर्भात राज्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने याआधीच परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन केले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विविध कामगार संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कामगार संघटना, व्यापारी संघटना, कामगार विभाग, तसेच किराणा बाजार आणि दुकाने मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय अंतिम करण्यात आला. त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने बाजार समित्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गोण्यांचे वजन 50 किलोच्या मर्यादेत ठेवावे यासाठी जनजागृती करण्यास सांगितले आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढउतार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा दरम्यान, या नव्या नियमामुळे बाजार समित्यांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. उलट, कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून त्यांना दिलासा मिळेल. एकूणच, या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या खांद्यावरील जड ओझे हलके होणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर