ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कळंब येथे श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त भव्य धार्मिक-सांस्कृतिक सोहळा

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कळंब तालुका (प्रतिनिधी) : नितेश क्षीरसागर

कळंब येथील रासा रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १ फेब्रुवारी ते रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा सप्ताह भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहात दररोज काकडा आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, हरिपाठ, महिला भजनी मंडळांचे भजन, नामवंत कीर्तनकारांची कीर्तने तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विनोदी काव्य व भारूड हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत श्रींचा भव्य पालखी सोहळा संपन्न होणार आहे. या पालखी सोहळ्यात परिसरातील ३० हून अधिक महिला व पुरुष भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे. सहभागी भजनी मंडळांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासाठी रिक्षा व साउंड सिस्टिमची व्यवस्था संबंधित मंडळांनी स्वतः करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणून साई बाबा महिला भजनी मंडळ (जळका), अविभाऊ घोडेवाले (कळंब), नारद मुनींच्या भूमिकेत श्री नरेंद्रभाऊ दुबे (कळंब) तसेच श्री गजराज कृपा धुमाल (कळंब) यांचा सहभाग राहणार आहे. भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींचा अभिषेक, भव्य मिरवणूक, काल्याचे कीर्तन व दुपारी महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी माता जगदंबा संगीत संच, देवळी यांच्या सुमधुर संगीत मैफिलीने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होणार आहे.

दरम्यान, श्री संत गजानन महाराज मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी देणगीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर मस्के यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर