ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिंदे गटाला साथ म्हणजेच भाजपला साथ:युतीच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच मनसेने ठाकरे गटाची साथ सोडली, भाजपचा टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत एकच खळबळ माजली आहे. भाजपने या घटनाक्रमाचा दाखला देत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना टोला हाणला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच मनसेने कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाची साथ सोडली, असे भाजपने म्हटले आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मनसेने महापालिका निवडणुकीत शिंदे गटाविरोधात आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर लगेचच मनसेने ठाकरे गटाला पाठिंबा दिल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत एकच खळबळ माजली आहे. मनसेच्या उच्चपदस्थ नेत्यांनी शिंदे गटाशी युती करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचा दावा करत या वादापासून स्वतःला दूर ठेवल्याचा दावा केला आहे. पण या घटनाक्रमाचे तीव्र पडसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेच्या युतीत पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये व नवनाथ बन यांनी ठाकरे बंधूंवर उपरोक्त टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती पत्त्याच्या बंगल्यापेक्षा लवकर कोसळली केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीवर निशाणा साधला. अजून निकाल लागून जेमतेम चार दिवस झाले. महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उध्दव ठाकरे व संजय राऊत यांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच, तिकडे कल्याण डोंबिवली मध्ये मनसेने उबाठाची साथ सोडलीच. उबाठाच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला. पत्त्यातील बंगला सुध्दा यापेक्षा जास्त टिकतो, असे ते म्हणाले. शिंदे गटाला साथ म्हणजे भाजपला साथ दुसरीकडे, भाजपचे अन्य एक प्रवक्ते नवनाथ बन यांनीही या प्रकरणी शिंदे गटाला साथ म्हणजेच भाजपची साथ असे विधान करून एकच ठाकरे बंधूंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसे व शिंदे गटाच्या युतीमुळे भाजपला दूर ठेवले जात आहे किंवा सत्ता स्थापनेपासून आम्ही लांब राहणार असे काहीही नाही. आम्ही सर्वजण एक आहोत. एकत्र मिळून काम करत आहोत. स्थानिक पातळीवर का असेना, पण मनसेने शिंदे गटाला साथ दिली, म्हणजेच भाजपला साथ दिली. यावरून कुठेही एकमेकांविरोधात वाद असण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही पाठिंबा घेण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी नवनाथ बन यांना विचारले असता त्यांनी त्याचे स्वागतच केले. उद्धव ठाकरेंची शिवसेना स्थानिक पातळीवर महापालिकांमध्ये महायुतीला पाठिंबा देत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करू. काँग्रेस व एमआयएम वगळून आम्ही प्रत्येकाचे स्वागत करू, असे ते म्हणाले. नेमके काय घडले कल्याण डोंबिवलीमध्ये? कल्याण डोंबिवलीमध्ये गत काही दिवसांपासून मनसे व शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आजपर्यंत त्याबाबत कोणत्याही पक्षाने अधिकृत भाष्य केले नव्हते. मात्र, आज बुधवारी मनसेचे 5 आणि एकनाथ शिंदे यांचे 53 नगरसेवक एकाचवेळी गट नोंदणीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी या दोन्ही पक्षांनी आपला गटही स्थापन केला. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची बैठक झाली होती. या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे आणि महापौर पदाची सूत्रे ठरली. त्यानंतर आज कोकण आयुक्त कार्यालयात श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, राजू पाटील यांचा एकत्रित फोटो समोर आला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्याची घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर