ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


⏹️ बोरी गदाजी येथे हर्षोउल्हासात साजरी झाली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी ने राज्यकारभार चालवताना चरित्र जोपासले, महिलांची पहिली फौज निर्माण करणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी तसेच स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे कार्य अहिल्यादेवी होळकर यांनी केले.छञपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणारी प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर असे प्रतिपादन जाहीर समाज प्रबोधन मेळाव्यात श्री विकास चिडे यांनी केले.काल दिनांक 31 मे 2024 रोज शुक्रवार ला बोरी गदाजी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संजय लव्हाळे सर होते तर उदघाटक म्हणून श्री संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन तुरारे,काशिनाथ पचकटे,हुसेन करडे,प्रदीप साबरे,वसंतराव बच्चे,बंडू डाहूले,अनिल बोबडे,अमर पिंपळकर,श्री पेंदाम सर,सौ मंगला करडे, गंगा करडे,अनिता राजूरकर,छाया राऊत, चंद्रकला गेडाम,शांताबाई निखाडे मंचावर उपस्थित होते.

जयंतीनिमित्त समाजातील जेष्ठ व्यक्तींचा यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या देवांश साबरे आणि प्रणय करडे या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री आशिष साबरे यांनी केले तर प्रस्तावना श्री गजानन तुरारे सर यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर