ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खरबडा गट ग्रामपंचायतीत लेखांकनाचा गोंधळ

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

२०२२ ते २०२६ पर्यंतच्या खर्चावर ग्रामस्थांचा सवाल, विशेष ग्रामसभेची मागणी

ज्ञानेश्वर आवारी झरी-जामणी,


झरी-जामणी तालुक्यातील गट ग्रामपंचायत खरबडा येथे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, ग्रामस्थांनी पंचायत समिती झरी येथील गट विकास अधिकारी (BDO) यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभा बैठकीत प्रभारी ग्रामविकास अधिकारी व सदस्य समिती ग्रामस्थांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर २९ जानेवारी २०२६ रोजी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत, मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीत बैठक घेण्यात आली.

या बैठकीतही ग्रामपंचायतीच्या लेखांकनाबाबत संपूर्ण व स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर बैठकीदरम्यान कोणतेही मूळ खर्चाचे बिल, व्हाउचर अथवा संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आलेली नाहीत, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तसेच तत्कालीन ग्रामविकास अधिकारी  कविता कुळमेथे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांमध्ये अनियमितता व अपूर्ण कामे असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे की वित्तीय वर्ष २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीतील ग्रामपंचायतीचे संपूर्ण वार्षिक लेखांकन सध्याचे ग्रामविकास अधिकारी श्री. प्रकाश बळीद व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत, ग्रामपंचायत स्तरावर विशेष ग्रामसभेत सादर करण्यात यावे.सदर विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायतीतील सर्व विकासकामे, खर्चाचा तपशील, निधी वितरण तसेच सर्व मूळ बिले व कागदपत्रे ग्रामस्थांसमोर मांडण्यात यावीत, जेणेकरून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहील व ग्रामस्थांचा विश्वास अबाधित राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.


  या निवेदनावर अतुल हिरामण पाटील, गणेश पेंदोर, सागर मच्छावार, अल्ताब सय्यद, तिरुपती मोरेवार, प्रविण राऊत, रोहित मोरेवार, सुरज चिक्राम, मणिकंठा मोरेवार, पंकज उइके, आदित्य मोरेवार, करण उरवते, रोहन शेडमाके, प्रशांत गेडाम,प्रथमेश कुंमरे, गणेश टेकाम, श्नीनिवास भोरेवार,प्रमोद मोरेवार,महेश येंबावार, सचिन मडकाम,संतोष नाग्रतवार यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

ग्रामस्थांनी पुढील ८ दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा आयोजित करून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली असून, पंचायत समिती प्रशासनाकडून आता काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर