ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

धक्कादायक:‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून पुण्यात मित्राकडून मित्राचा खून, तिन्ही आरोपींना अटक, बेसबॉल बॅटने बेदम मारहाण

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गोखलेनगर परिसरात एका तरुणाची बेसबॉल बॅटने बेदम मारहाण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “कॉमन गर्लफ्रेंड’ (दोघांची एकच प्रेयसी) असल्याच्या वादातून अत्यंत जवळच्या मित्रानेच आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हर्ष मच्छिंद्र जाधव (२३, रा. गोखलेनगर) या तरुणाचा निर्घृण खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत तिन्ही आरोपींना अवघ्या काही तासांत नवी मुंबईतून जेरबंद केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना अटक केली आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षातून ओढून हल्ला घटनेच्या दिवशी पहाटे पावणेतीन ते तीन वाजेच्या सुमारास हर्ष जाधव त्याच्या घराबाहेर एका रिक्षात बसला होता. यावेळी तिथे पोहोचलेल्या आरोपींनी हर्षला जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढले आणि बेसबॉल स्टिकने त्याच्यावर बेदम मारहाण सुरू केली. या हल्ल्यादरम्यान बेसबॉल स्टिकचा एक जोरदार वार हर्षच्या कानावर बसला, ज्यामुळे त्याचा कान फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून स्थानिक रहिवासी गोळा झाल्यावर आरोपी तिथून पळून गेले. जखमी हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, तरीही गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. परिमंडळ ४ चे डीसीपी रजनीकांत चिलीमुला यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार दोघांच्या कॉमन गर्लफ्रेंडच्या वादातून आणि घरात घुसून दिलेल्या धमकीच्या रागातून घडला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. काय होता नेमका वाद? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हर्ष जाधव आणि आरोपी यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून “कॉमन गर्लफ्रेंड’वरून तीव्र वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून दोन दिवसांपूर्वी हर्षने दारूच्या नशेत आरोपीच्या घरात घुसून मोठा गोंधळ घातला होता. तसेच आरोपीच्या कुटुंबीयांसमोरच त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. या अपमान आणि धमकीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हर्षचा काटा काढण्याचे ठरवले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर