बातमी ऐका (Marathi Voice Reader)
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. काल तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले होते. तर सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. आज अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या बैठक पार पडली. अधिवेशनात आघाडीची रणनीती, सभागृहातील कामकाज यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.