ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मातोश्रीबाहेर नीतेश राणेंसाठी बॅनरबाजी:ठाकरेंच्या निवासस्थानासमोर राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख, राजकीय चर्चांना उधाण

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे नेते नीतेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठा ठिणगी पडली आहे. मुंबईतील कलानगर परिसरात, थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या बाहेरच राणे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर नीतेश राणे यांचा उल्लेख ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा करण्यात आला आहे. यामुळे ठाकरे आणि राणे समर्थकांमधील वाद पुन्हा एकदा विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. नीतेश राणेंचा ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ असा उल्लेख! भाजप नेते नीतेश राणे यांचा २३ जून रोजी वाढदिवस आहे. याच वाढदिवसाचे औचित्य साधून राणे समर्थकांनी थेट ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात घुसून ही बॅनरबाजी केली आहे. नितेश राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लावण्यात आलेले हे फलक अत्यंत लक्षवेधी ठरत आहेत. यापूर्वी नीतेश राणे यांच्या समर्थकांकडून त्यांचा ‘हिंदूरक्षक’ असा उल्लेख केला जात होता, मात्र आता ‘मातोश्री’च्या मुख्य रस्त्यावरच थेट ‘हिंदू गब्बर’ आणि ‘वस्ताद’ अशा जळजळीत पदव्या वापरून लावण्यात आलेले बॅनर्स ठाकरे गटाला थेट आव्हान देणारे मानले जात आहेत. राणे-ठाकरे कलगीतुरा आणखी रंगणार नीतेश राणे आणि ठाकरे कुटुंबातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेरच अशा पद्धतीची बॅनरबाजी करून राणे समर्थकांनी ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळल्याची चर्चा रंगली आहे. या बॅनरबाजीला आता ठाकरे गटाचे शिवसैनिक त्याच आक्रमकतेने उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा.. मान्सून 48 तासांत मुंबईत पोहोचणार: UPत मुसळधार पावसाने झाडे, खांब उन्मळून पडली; MPत वीज, पंजाबमध्ये झाड कोसळून 2 ठार
देशात 15 दिवसांपासून छत्तीसगड सीमेवर अडकलेला मान्सून सोमवारी पुढे सरकला. तो पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपासून 20 किमी दूर असलेल्या अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील 24 ते 48 तासांत तो मुंबईत पोहोचू शकतो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशातील 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. छतरपूरमध्ये सोमवारी वीज कोसळून दोन मुली भाजल्या. दोघींना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे एकीचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 6 शहरांमध्ये सोमवारी दुपारनंतर पाऊस झाला. बस्तीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडे आणि खांब उन्मळून पडले. एक झाड गाडीवर पडले. रस्त्यावर युनिपोल पडल्याने वाहतूक कोंडी झाली. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर