ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चिंचवडमध्ये ‘अजितसृष्टी’ उभारण्याचे निर्देश:आरक्षित जागेवरील एमआयडीसीचे प्लॉटिंग तात्काळ थांबवा : अण्णा बनसोडे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आणि आठवणींची जपणूक करणारी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, तसेच संबंधित जागेवरील एमआयडीसीचे प्लॉटिंग तात्काळ थांबवावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनातील बैठकीत त्यांनी चिंचवड येथील आरक्षण क्रमांक ३०१ असलेल्या पर्यटन केंद्रासाठी राखीव जागेच्या संदर्भात आढावा घेतला. विकास आराखड्यात पर्यटन केंद्रासाठी राखीव असलेल्या या जागेवर एमआयडीसीकडून प्लॉटिंग करून ती खाजगी उद्योजकांना विक्री करण्याचे नियोजन होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणाला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने हे नियोजन रद्द करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले. या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वस्ती असून, आरक्षित जागेचे मूळ स्वरूप कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पर्यटन केंद्राचे आरक्षण कायम ठेवून त्या ठिकाणी ‘अजितसृष्टी’ उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीस एमआयडीसी आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर